खानापूर (प्रतिनिधी) : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधुन दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने सेवा पंधराव्या साजरा करण्यात येत आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनाचे पत्रक वितरण करण्यात आले.
वितरण प्रसंगी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, पत्रक वितरण प्रभारी किरण यळ्ळुरकर, प्रसार माध्यम प्रमुख राजेंद्र रायका, लक्ष्मण झांजरे, बसवराज निंबाळकर, नंदगड शक्ति केंद्र प्रमुख सयाजी पाटील, कलमेश तिगडी, मोहन पाटील, गर्लगुंजी शक्ति केंद्र प्रमुख सुनिल मासेकर, खानापूर शक्ती केंद्र प्रमुख सुनिल नायक आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta