खानापूर : जांबोटी ता. खानापूर येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुलांच्या कब्बडी व व्हॉलीबॉल संघाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली. त्याबद्दल एस. पी. साऊंडचे मालक श्री. रवींद्र रवळनाथ गुरव यांनी खेळाडूंना गणवेश देऊन गौरव केला.
खानापूर तालुका क्रीडा स्पर्धांमध्ये माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी करून यश संपादन केले. म्हणून राजवाडा जांबोटी येथील श्री पावनाई साऊंड सिस्टीमचे मालक रविंद्र गुरव यांनी एकूण 14 खेळाडूंना गणवेश दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांचेकडे सदर गणवेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी विनायक जांभळेकर, सुशांत पारवाडकर व इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta