खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी दररोज २० रूपये एका स्वच्छतागृहाला खर्च करून शहरातील स्वच्छतागृह व्यवस्थित ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
त्याचबरोबर नगरपंचायतीच्या २० वार्डातून कुपनलिकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाणी सोडण्यावर नियंत्रण नसल्याने याचा दुरूपयोग होत आहे, असे मत नगरसेवक नारायण मयेकर यानी मांडले. काही कुपनलिकाना नागरिक केव्हाही चालु करतात त्यामुळे पाण्याचा दुरूपयोग होत आहे. तर नगरपंचायतीच्या कुपनलिकाना काही घराना डायरेक्ट कनेक्शन घेतल्याचे सांगण्यात आले.
तेव्हा नगरपंचायतीकडून सुरळीत कुपनलिकाचा पाणी पुरवठा झाला तर शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसाविणार नाही. अन्यथा कुपनलिकाचा वापर कोणीही किती वेळा सुरू करून कुपनलिका नादुरूस्त होण्यास वेळ लागणार नाही. यावर वेळीच ठेवा अशी मागणी करण्यात आली.
खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्ष मजूर खानापूरी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, तसेच चिफ ऑफिसर बाबासाहेब माने आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यानी केले.
बैठकीत वार्ड नंबर ११ मधील विद्या नगरात नवीन अंगणवाडी समोर रस्त्यावर गटार पाईप घालणे तसेच विद्यानगरातील कुपनलिकेचा हॅडपंप बदलुन १ एचपी मोटर बसविणे, विद्यानगरला जाणाऱ्या रस्त्यावर मोरम घालणे, वार्ड नंबर १६ गटारी, रस्ता दुरूस्ती करणे, वार्ड नं ५ चिरमुरकर गल्लीतील अंगणवाडी दुरूस्ती करणे, १९ नं वार्डातील मुतारीला दरवाजा बसविणे, प्रत्येक वार्डातील खड्डे पडलेल्या रस्त्याची करणे, व गटारी दुरूस्ती करणे यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला नगरसेवक नारायण मयेकर, आप्पया कोडोळी, महमद रफिक, विनोद पाटील, नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी, फातिमा बेपारी, जया भुतकी व नगरपंचायतीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta