खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पंधरावडा कार्यक्रमात शनिवारी खानापूर येथील श्री साई हॉस्पीटलमध्ये मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.
कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, धनश्री सरदेसाई, किरण यळ्ळुरकर, आपल्या कोडोळी, अॅड. चेतन मणेरीकर, माजी सभापती सयाजी पाटील, लक्ष्मण बामणे, प्रकाश निलजकर, राजेंद्र रायका, प्रकाश तिरवीर, रवी बडगेर अदी उपस्थित होते.
यावेळी खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली. तर बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष बोलताना म्हणाले की, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन खानापूर तालुका भाजपाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत पंधरवडा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून आगळावेगळा वाढदिवस साजरा होत आहे.
यावेळी श्री साई हॉस्पीटलचे डॉ. संजीव कुलकर्णी, डॉ. दोडमणी व स्टॉप, नर्स आदींनी शिबीर संपन्न करण्यासाठी सहकार्य केले.
आभार गुंडू तोपिनकट्टी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta