खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीची बैठक नगरपंचतीच्या सभागृहात सोमवारी दि. १२ रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते.
यावेळी बैठकीत देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तेव्हा खानापूर शहरातील हाॅटेल, हेअर कटींग, सार्वजनिक ठिकाणी दक्षतेचा इशारा देण्यासाठी याठिकाणी सॅनिटायझर, मास्क, सोशल टिस्टन व स्वच्छता आदी नियमाचे पालन करण्यासाठी नगरपंचायतीने कमिटी करून शहरात जागृती करणे, जो नियमाचे पालन करत नाही त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारा, अशी चर्चा गुरूवारी सभागृहात झालेल्या बैठकीत करण्यात आली.
यावेळी नगरपंचायतीचे प्रेमानंद नाईक प्रास्ताविक केले. तर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने यानी उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी बैठकीत मागील बैठकीतील ठरावाच़े वाचन करण्यात आले. जुन जुलै महिन्यातील जमाखर्चावर चर्चा करण्यात आली.
सन २०१९ -२० व २०२१-२२ या सालात नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा मंजुरीबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील गटारी, रस्ते विकासावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक नारायण मयेकर, विनायक कलाल, विनोद पाटील, प्रकाश बैलुरकर, आपय्या कोडोळी, नारायण ओगले, हणमंत पुजार, तोहिद हुसेनसाब, महमद रफिक वारेमनी, मेघा कुंदरगी, शोभा गावडे, मिनाक्षी बैलूरकर, लता पाटील, जया बुतकी, राजश्री तोपिनकट्टी, फातिमा बेपारी, सहेरा सनदी, आदी नगरसेवक उपस्थित होते यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.