खानापूर (प्रतिनिधी) : पुणे हडपसर येथील बेळगाव भागातील नागरिकांनी स्थापन केलेल्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वृदांवन मंगल कार्यालय, नर्हेगाव येथे नुकताच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील होते.
यावेळी सभेला पुणे शहरातील बेळगांवकर उपस्थित होते. कोरोनाचा खडतर काळ असतानाही या वर्षी संस्थेने सभासदांना 12% लाभांश दिलेला आहे. त्यामुळे सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे. संस्था उत्तमरितीने चालण्यासाठी अनेक मान्यवरांनी सुचना केल्या आहेत.
यावेळी अध्यक्ष श्री. अजित पाटील यांनी संस्थेचे भागभांडवल उत्तमस्थितीत असल्याचा विश्वास दिला आहे. तसेच यावर्षी चांगला नफा देखील झाला आहे म्हणून संचालक, कर्मचारी व सभासदांचे अभिनंदन केले व पुढील काळात देखील जास्तीत जास्त सभासदांना कर्जे दिली जातील असे सांगितले.
पुणे शहरात रहाणारे बेळगांवकराना जास्तितजास्त संख्येने सभासद होण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक अशोक पाटील यांनी सुत्रसंचालन केले व संस्थेचा अहवाल सांगितला. याप्रसंगी अॅड. शिर्के संचालक सुरेश हलगी, मारूती घाडी, अशोक सुतार, श्री. परशुराम चौगुले, श्रीमती संध्या भोगण, सौ. शिरवळकर, मान्यवर सभासद व उद्योजक नारायण देसाई, मारूती वाणी, श्री. काकतकर, श्री. निलजकर, श्री. जाधव, श्री. मोटार, एल. डी. पाटील, अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta