
खानापूर : खानापूर येथील दुर्गामाता दौडमध्ये डॉ. सोनाली सरनोबत सहभागी झाल्या होत्या.
शिवस्मारक खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला दूध व कोमट पाण्याने अभिषेक करून सुरुवात झाली. पुतळ्याला पुष्पहार घालून कपाळावर अष्टगंध लावण्यात आला. सर्व धारकरी सुंदर भगवे फेटे परिधान करतात. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वात भगव्या ध्वजाचे पूजन करून दौड सुरू झाली.
खानापूर येथील शिवस्मारकापासून प्रारंभ होऊन हत्तरगुंजी येथे समारोप झाला. हजारो मुले, मुली व सर्व वयोगटातील लोक सहभागी झाले होते.
डॉ. सोनाली सरनोबत नेहमीच सर्व हिंदू परंपरांचे समर्थन आणि पालन करतात.
Belgaum Varta Belgaum Varta