खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणीत (ता. खानापूर) येथील विठ्ठल मंदिरात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्या प्रविणा साबळे होत्या.
कार्यक्रमाला भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, आकाश अथणीकर, नारायण पाटील, संजय पाटील, लक्ष्मी मादार, ईश्वर वारेकर, रावजी देसाई, हणमंत चिखलकर, मोहन काजुनेकर, रामलिंग पाटील, नागेश मनेरीकर, मल्लू चव्हाण, धोंडीबा बैलुरकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक भरमाणी पाटील यांनी केले.
उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
हळदीकुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधुन भाजप नेते व विठ्ठलराव हलगेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी भरमाणी पाटील, आकाश अथणीकर, विनायक मुतगेकर आदिंनी विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, खानापूर तालुक्यातील स्त्रीयांचा आणि तालुक्याचा विकास अद्याप तसाच आहे. तेव्हा तालुक्याचा विकास व्हायचा असेल तर स्थानिक उमेदवार आमदार झाला पाहिजे. तेव्हा येत्या निवडणुकीत तालुक्याचा उमेदवार आमदार झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेवटी आभार रूपा पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta