खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) गावच्या इदलहोंड ते बेळगांव पणजी महामार्गाच्या फाट्यापर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशातून तसेच वाहन धारकातून तसेच दुचाकी वाहन धारकातून कमालीची नाराजी पसरली होती.
या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत ग्राम पंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनही देण्यात आले होते. मात्र संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले.
त्यामुळे इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांनी स्वखर्चाने १० टिप्पर खडी टाकून व जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याचे खड्डे बुडविले. त्यामुळे इदलहोंड भागातील नागरिकांतून समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य उदय पाटील, माळ अंकले ग्राम पंचायत सदस्य यल्लापा होसुरकर तसेच विकास जाधव, अरविंद पाटील, गजानन पाटील, रूक्मान्ना शिरगावकर, यशवंत पाटील, कृष्णाजी पाटील, सुशांत सुतार, प्रकाश जाधव, नारायण पाखरे, निशांत पाटील, शुभम बाचोळकर, मोहन पाटील, किपण पाटील, सामान्ना नागेनट्टीकर, सोमनाथ जाधव, राजाराम जाधव, जोतिबा चोपडे आदी इदलहोंड गावचे नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta