खानापूर : आज दुपारी खानापूरच्या कार्यसम्राज्ञी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी कक्केरी येथे जाऊन बिष्टाम्मा देवीचे दर्शन करून आशिर्वाद घेतले.
खानापूर तालुक्यातील सामान्य जनता, कष्टकरी, कामगार वर्ग, शेतकरी, या सर्वांचे जनजीवन सुखकर व्हावे असे देवीकडे साकडे घातले असल्याचे आमदार ताई म्हणाल्या.
आमदार अंजलीताईंनी देवीची ओटी भरली. मंदिर कमिटीतर्फे आमदार ताईंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कक्केरी पंचायतचे अध्यक्ष भिमाप्पा आंबोजी, महादेव कोळी, रियाझ पटेल, अरूण बेळगांवकर, जांबोटकर सर, लाल पटेल, भरतेश तोरोजी, विवेक तडकोड, शंकर गस्टोळी, मंजू गोधोळी, भूरणकीचे युसुफ हरगी व टीम, राजू डिसील्वा, काशीम हट्टीहोळी, ग्रामस्थ मंडळी, वगैरे सर्वजण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta