खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडीची समाप्ती उत्साहात झाली. करंबळ गावामध्ये घटस्थापना ते दसरापर्यंत करंबळ, रुमेवाडी, जळगे, देवनगर, रुमेवाडी क्रॉस, होनकल, गंगवाळी, कौंदल व शिंदोळी या गावांमध्ये श्री दुर्गामाता दौड पोहोचविण्यात आली व या श्री दुर्गामाता दौडीची समाप्ती करंबळ गावांमध्ये करण्यात आली. प्रारंभी मराठी शाळा करंबळ येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पूजा व शस्त्रपूजन करून गावातील तरुण धारकरी कुमार अभिलाष राजाराम कोडचवाडकर याच्या हस्ते महाराजांना अर्पण करून ध्वजाची पूजा करण्यात आली. ही दौड पंचायत रोड, धोंडदेव गल्ली, श्री दुर्गा देवी मंदिर, श्री चव्हाटा- होळी, श्री ब्रह्मदेव मंदिर, श्री ज्योतिबा मंदिर, श्री पंचमाई मंदिर, श्री कलमेश्वर मंदिर, श्री लक्ष्मी गदगा, श्री धोंडदेव देवस्थान, श्री हनुमान मंदिर, श्री जन्मीदेव, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री सदर देवस्थान, आंबेडकर गल्ली मार्गे श्री महालक्ष्मी मंदिर येथे या दौडीची समाप्ती करण्यात आली. या दौडीमध्ये जळगे, देवनगर, कौंदल होनकल, गंगवाळी, रुमेवाडी, रुमेवाडी क्रॉस व शिंदोळी गावातील धारकरी शिवप्रेमी, गावकरी मंडळी उपस्थित होती.
Belgaum Varta Belgaum Varta