खानापूर (प्रतिनिधी) : कानसीनकोपात (ता. खानापूर) खुल्या व्हॉलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी दि. ८ रोजी पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवणा गंदिगवाड होते. तर सिध्दरामया स्वामीजी यांच्या सानिध्यात झालेल्या कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, शितल बंबाडी, हणमंत पाटील, बसवराज निंबाळकर, यशवंत कोडोली, डाॅ. संजीव कुलकर्णी आदी मान्यवर आदी उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, मनुष्याचे आरोग्य चांगले राहायचे असेल तर खेळ हे उत्तम साधन आहे. आपल्या देशाच्या युवकांनी खेळात भाग घेऊन आरोग्य बरोबर देशाचे नाव उज्वल करा, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरानी आपले विचार मांडले.
यावेळी खानापूर तालुक्यातील व्हाॅलीबाॅल संघानी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.
उपस्थित पाहुण्यानी व्हाॅलीबाॅल खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेचे उद्घाटन केले.
Belgaum Varta Belgaum Varta