खानापूर : रानडुकराची शिकार करून त्याचे मास विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळताच वनविभाग अधिकाऱ्यांनी सापळा रचून हलशी गावातील ज्ञानेश्वर हलगेकर याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 15 किलो मास, कोयता, कुऱ्हाड, वजनकाटा जप्त करण्यात आले.
ज्ञानेश्वर हलगेकर याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला खानापूर न्यायालयात हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.
नागरगळी झोनचे उपवन अधिकारी एन. जी. हिरेमठ, विजयकुमार कौजलगी, महांतेश लचांडी, विष्णू वीर यांनी कारवाई केली.
Belgaum Varta Belgaum Varta