Monday , September 21 2026
Breaking News

रामायण लिहिणारे वाल्मिकी हे महान तत्वज्ञ : प्रमोद कोचेरी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : रामायण लिहून वाल्याचा वाल्मिकी झाले. त्यामुळे रामायण लिहिणारे वाल्मिकी हे या देशाचे महान तत्वज्ञ आहेत.
म्हणून प्रत्येक माणसाने कोणत्या ही कामाचा जप करून ते यशस्वी केल्यास तुम्ही ही वाल्मिकी शिकवण घेतल्या आनंद मिळेल, असे विचार बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आंबोळी येथील वाल्मिकी जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, नलावडे ग्राम पंचायत क्षेत्रात विकास कामासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. यापुढे विकासासाठी तसेच कबनाळी गावचा रस्ता तयार व्हावा यासाठी मी सतत प्रयत्न करने असे सांगितले.

आंबोळी (ता. खानापूर) येथे ग्रामस्थांनी व वाल्मिकी समाजाच्यावतीने वाल्मिकी जयंती साजरी झाली. यावेळी कार्यक्रमाला समलिंगी नाईक, माजी ग्राम पंचायत सदस्य शंकर शास्त्री, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, नलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते महर्षी वाल्मिकींच्या फोटो पुजन करण्यात आले. तर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी गावचे पंच, ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *