खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समिती अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच युवा पिढीला तसेच महिला वर्गाला समितीच्या कार्यात सामावून घेण्यासाठी खानापूर तालुक्यात लवकरच युवा आघाडी व महिला आघाडी स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
तालुक्यात जनजागृतीची सुरूवात 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता चिरमुरकर गल्ली खानापूर येथील श्रीज्ञानेश्वर मंदिराच्या आवारात ज्ञानेश्वरी व संत तुकाराम गाथा पूजन व ग्रंथदिंडी काढून करण्यात येणार आहे. तालुक्यात समितीच्या जागृतीसोबत मराठीचा जागर करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक त्यानंतर संपूर्ण तालुक्यात समिती समिती अधिक बळकट करण्यासाठी जागृती दौरा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार दिगंबर पाटील यांनी दिली.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शिवस्मारकात माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
गावोगावी दिंडी काढून समिती व मराठीच्या जागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. मराठीचे अस्तित्व संपवणाऱ्या शक्ती हद्दपार केल्या पाहिजे त्यासाठी तरुणांची नवी पळी उभारण्याचे काम त्वरित व्हावे, असे मत वसंत नावलकर यांनी व्यक्त केले.
नंदगड येथील ब्रिटिशकालीन जॉईन सेंट्रल स्कूलमधील मराठी शाळा विलीन करण्याचा प्रयत्न तालुका शिक्षण खात्याकडून सुरू आहे त्यामुळे विलीनीकरणाला तीव्र विरोध करत गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या जागृती दौऱ्यासाठी समिती कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने देणगी जाहीर केली आहे.
यावेळी प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, यशवंत बिर्जे, महादेव घाडी, शिवाजी पाटील, अविनाश पाटील, मर्याप्पा पाटील, रुक्माना झुंजवाडकर, ईश्वर बोभाटे, प्रल्हाद मादर, अमृत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.