खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीची मासिक बैठक नुकताच पार पडली.
या बैठकीत ग्राम पंचायतीचे पीडीओ गैर हजर होते.
यावेळी बैठकीत उपाध्यक्ष व सदस्यांनी ग्राम पंचायत पीडीओ आनंद भिंगे यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका असल्याने लोकायुक्तांच्याकडे तक्रार केली आहे. यावेळी बैठकीत ग्राम पंचायत सदस्यांनी मागणी केलेली माहिती जो पर्यंत देण्यात येत नाही. तोपर्यंत विकास कामासाठी कोणताही खर्च दाखवु नये.
ग्राम पंचायत पीडीओ आनंद भिंगे यांनी ३० ऑगस्ट रोजी बैठकीत सदस्यांची संख्याबळ नसताना अल्प सदस्यांनी सह्यानशी ठराव मंजूर करणे हे योग्य नव्हे अशी तक्रार करण्यात आली आहे.
या बैठकीला अध्यक्ष, उपाध्यक्ष व २३ पैकी १९ सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta