खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सभा गुरूवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे आयोजित केली आहे. सदर बैठकीत २१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या जनजागृती मोहीमे संदर्भात तसेच १ नोव्हेंबर रोजी काळादिन पाळण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबरराव पाटील कळवितात.
Belgaum Varta Belgaum Varta