
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि जंगल भागातील शिरोली ग्राम पंचायत हद्दीतील अबनाळी गावाला माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ यांनी आपल्या फंडातून अबनाळी गावासाठी सीसी रोड साठी निधी मंजूर केला. त्या कामाचा शुभारंभ गुरूवारी दि. १३ रोजी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या शुभहस्ते कुदळ मारून करण्यात आला.

यावेळी प्रारंभी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. तर खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनी श्रीफळ वाढवुन कामाचा शुभारंभ केला.
यावेळी शिरोली ग्राम पंचायत सदस्य श्रीपाद शिवोलकर, भाजप नेते गजानन पाटील, ग्राम पंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अबनाळी गावाला सीसी रोड कामाचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थांतुन समाधानाचे वातावरण पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta