Wednesday , March 4 2026
Breaking News

हलशी ते गुंडपी रस्त्याची दयनीय अवस्था

Spread the love

 

खानापूर : हलशी ते गुंडपी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती हलशी-गुंडपी रस्त्याची झाली आहे. संबंधित खात्याकडे वारंवार मागणी करून देखील या रस्त्याची डागडुजी करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करत आहे.
छत्रपती शिवाजी हायस्कूल हलशी ते सरकारी मराठी शाळा हलशीवाडी ते गुंडपी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हलशी ते गुंडपी रस्त्यावरून दररोज अनेक विद्यार्थी व नागरिक ये-जा करत असतात, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गुंडपी ते हलशी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या पडत असलेल्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले आहे. वाहनचालकांना साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याच्या अंदाज येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर अनेकदा छोटेमोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *