खानापूर (प्रतिनिधी) : बोगुर (ता. खानापूर) गावात गेल्या आठ वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी करण्यात आली. परंतु जनतेच्या सेवेसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स, सेविका आदीची सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी बोगुर गावच्या नागरिकांनी भाजप नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजस नांद्रे यांना देण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी निवेदनाचा स्विकार करून येत्या दहा दिवसात सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड काळात सुविधा असत्यातर बराच फायदा झाला असता, तसेच मागील वर्षी ट्रॅक्टर अपघातातील सहा जणांचा जीव वाचला असता. तेव्हा लवकरात लवकर सोय व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना बोगुर गावचे संजु मुरगोड, आदेश आमगोळ, हणमंत निलजगी, लिंगराज मुरगोड, मंजु केदारी, देमाप्पा हुणशेकट्टी, शंकर अमलापूर, गोपाळ कारगार व भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष रोशन सुतार, माऊली पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta