दोघे जण किरकोळ जखमी : कारचे हजारो रुपयांचे नुकसान
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या आरटीओ ऑफिस जवळ दोन कारच्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 16 रोजी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती कार क्रमांक एमएच 12 के.टी. 9934 ही गाडी निपाणीहून कोल्हापूरकडे जात होती. येथील आरटीओ कार्यालयाजवळ आले असता पाठीमागून येत असलेल्या स्विफ्ट कारने क्रमांक केए 26 एन 2404 मागून धडक दिली. धडक इतकी जोरात होती की मारुती कार डिव्हायडरला धडकून रस्त्यात पलटी होऊन पडली. या मारुती कारमध्ये तीन जण होते सुदैवाने यातील कोणालाही गंभीर इजा झाली नाही.
किरकोळ, जखमींना जय हिंद डेव्हलपर्सच्या रुग्णवाहिकेतून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आले.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएसआय विजय पाटील, पोलीस एस. एन. सगरेकर यांनी भेट देऊन अपघातग्रस्त वाहने जय हिंद डेव्हलपरच्या क्रेन व कर्मचार्यांनी बाजूला केली.
Check Also
श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …