निपाणी : कोरोना काळात रोजगाराविना हालाखीचे जीवन काढणार्या अक्कोळ येथील 29 कर्मचार्यांना तसेच अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या 43 कुटुंबाना शासनाकडून उपलब्ध झालेल्या व जोल्ले उद्योग समूहाच्यावतीने जीवनावश्यक कीटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अक्कोळ येथील जोल्ले उद्योग समूह कार्यालयात आयोजक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बापूसाहेब पाटील (कट्टीकल्ले) होते.
प्रारंभी शाखाधिकारी प्रदीप देसाई यांनी स्वागत केले. यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य सुहास गुग्गे यांनी, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या 43 लाभार्थीना जोल्ले उद्योग समुहाकडून तर आपद्ग्रस्त 29 कर्मचार्यांना शासनाकडून उपलब्ध झालेल्या कीटचे वितरण करण्यात आले. याकामी मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. मतदारसंघाच्या विकासासाठी विविध कामाची पूर्तता करताना जोल्ले दाम्पत्याने कधीच जात, धर्म, गट, तट व पक्षभेद न करता सर्वांगीण विकास साधल्याचे निरंजन कमते यांनी सांगितले.
यावेळी रावसाहेब फराळे, प्रकाश आवटे, संदीप सदावर्ते, दीपक जाधव, संजय पिसाळ, राजू बसर्गे, रमेश म्हेत्री, सचिन जाधव, गुंडा पोतदार, गोटू एणपे, अभिजीत कुलकर्णी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
