Tuesday , June 18 2024
Breaking News

हिंदू सणावरील निर्बंधाबाबत तहसीलदारांना आज निवेदन

Spread the love

 

श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ : संभाजी चौकात जमण्याचे आवाहन
निपाणी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासाठी येथील श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ व निपाणी परिसरातील गणेश उत्सव मंडळ व्यावसायिकांच्या वतीने महादेव मंदिर येथे पहिली बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर रविवारी (ता.15) नगरसेवकांच्या दुसरी बैठक झाली. त्यामध्ये हिंदू सणावर घालत असलेल्या निर्बंधास विरोध दर्शवून कोरोना संदर्भात आम्ही काळजी घेवून उत्सव साजरा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता.17) सकाळी 10 वाजता तहसीलदारांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तर बैठकीला सांगूनसुद्धा अनुपस्थित नगरसेवक व नगरसेविकांचा निषेध करण्यात आला.
गणेशोत्सवर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. त्यांची आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत आहे. उत्सव साजरा झाला तर त्यांना देखील आर्थिक मदत होऊ शकते. याची दखल घ्यावी तरी निवेदन देण्याकरीता निपाणी व निपाणी परिसरातील सर्व गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, अ‍ॅड. निलेश हत्ती, श्री. चव्हाण यांच्यासह विविध मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस नगरसेवक संजय सांगावकर, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, दीपक सावंत, अवधूत देशपांडे, बाबासाहेब चंद्रकुडे, प्रतीक शहा, रोहित पाटील, सागर कुंभार, राघवेंद्र गणाचारी, कृष्णा मोडीकर, संदीप माने, प्रसाद औंधकर, अक्षय बेलद, अमोल कोठीवाले, अक्षय भोसले, प्रतीक पाटील, गणपती वसेदार, रवींद्र चंद्रकुडे, राहुल चौगुले यांच्यासह नगरसेवक, गणेश मुर्तीकार, मंडप डेकोरेटर्स साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम, बँजो व्यवसायिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बालकामगार निषेध दिनी कुर्ली हायस्कूलमध्ये प्रबोधनपर नाटिका

Spread the love  निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात मिनी गुरुकुल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *