विद्यार्थ्याविनाच शाळेसमोर ध्वजारोहण: सर्वच कार्यक्रमांना फाटा
निपाणी : शहर आणि ग्रामीण भागात कोरोना संसर्गामुळे रविवारी (ता.15) अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय व इतर सामाजिक संघटनातर्फे आयोजित सर्वच कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता. शिवाय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ध्वजारोहण केले.
येथील नगरपालिका कार्यालय आणि डॉ. आंबेडकर सार्वजनिक वाचनालयासमोर नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. येथील मुन्सिपल हायस्कूलसमोर खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी, नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले. तहसीलदार कार्यालयासमोर तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, तालुका पंचायत कार्यालयासमोर जावेद बसलिंलगय्या सज्जन यांच्या प्रमुख उपस्थितीत मल्लिकार्जुन ऊळेगड्डी, मंडल पोलीस निरीक्षक कार्यालय समोर उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
फीमेल एज्युकेशन सोसायटीमधील भागीरथीबाई शाह कन्या शाळेत संस्थेचे खजिनदार अनीलकुमार मेहता, गोमटेश इंग्लिश माध्यम हायस्कूलमध्ये दिलीप पठाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. निपाणी भाग काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर माजी आमदार काकासाहेब पाटील व आजी-माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार, मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्या स्नेहा घाटगे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळमध्ये संचालक विक्रमादित्य धुमाळ, सेक्रेटरी ए. सी. धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे चेअरमन चंद्रास धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
