बेळगाव : टिळकवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघाच्यावतीने 75 वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पाडण्यात आला. राज्य सरकारचे दिल्ली येथील प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आपल्या भारत देशावर 150 वर्ष ब्रिटिशांचे राज्य होते. अशा प्रसंगी महात्मा गांधीजी, सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेक देशवीरांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण पणाला लावून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. आज आपण स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम साजरा करीत आहोत, हे अनेक देशभक्तांच्या त्यागामुळेच, असे शंकरगौडा पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी, संतोष भेंडिगेरी, विवेकानंद पोटे, दिलीप सोहनी, वर्धमान मरेन्नावर, किरण बेकवाड, श्रीमती शांताबाई धडेद, श्रीमती वाघवडेकर, विवेक खाडे, मंजुनाथ शिरोडकर, संतोष होंगल, हिरालाल चव्हाण, डी. के. पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. संचालक सुभाष होनगेकर यांनी आभार मानले.
