खानापूर : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खानापूर तालुक्यातील चिमुकलीचाही सहभाग लक्षवेधी ठरला.
काल भारत जोडो यात्रेत खानापूरमधून हजारो कार्यकर्त्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये हत्तरगुंजी येथील सविता व गुंडू मयेकर यांची कन्या कु. तेजस्विनी गुंडू मयेकर ही देखील खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासोबत सहभागी झाली होती.
कालच्या भारत जोडो यात्रेत या चिमूलकलीचा सहभाग लक्षवेधी ठरला होता. आमदार अंजली निंबाळकर यांनी या चिमुकलीला राहुल गांधी यांच्या सोबत चालण्याची संधी दिली. तेजस्विनीसोबत राहूल गांधींनी गप्पा मारल्या. तिला खाऊ दिला. त्यामुळे चिमुकली भारावून गेली राहुल गांधींच्या भेटीविषयी सर्वत्र चर्चा चालू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta