खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता.खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित कुप्पटगिरी क्राॅसजवळील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापनदिन सोमवारी दि. १७ रोजी २ वाजता होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विठ्ठल हलगेकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शांतिनिकेत पब्लिक स्कूलचे चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, शांतिनिकेतन काॅलेजचे चेअरमन प्रा. बंडू मजुकर, संस्थेचे सेक्रेटरी प्रा. राजेंद्र पाटील, तसेच महालक्ष्मी ग्रुप सेक्रेटरी महादेव बांदिवडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta