खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावाच्या पश्चिमेस असलेल्या धरणाची अवस्था फार बिकट झालेली आहे. सदर धरण हे माजी आ. कै. बसपान्ना आरगावी यांनी नंदगड गावाच्या शेतकऱ्याच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बांधले होते. या नंतर नंदगड धरणाचा आणि म्हणावा तसा गावाचा विकास झालेला नाही. आजपर्यंत कुठल्यापन लोकप्रतिनिधींनी धरणाचा विकासाबद्दल विचार करत नाही. परंतु धरणाचे मुख्य कालवे पोट कालवे धरणाची दुरुस्ती न झाल्यामुळे तसेच पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कालवे नादुरुस्त असल्यामुळे सदर धरणाच्या पाण्याचा उपयोग शेतीला न होता त्याचा थेट वापर वाळू काढणाऱ्या माफिया लोकांनाच होतो. दरवर्षी सदर धरणाच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून अनुदान येते पण आजवर मायनर इरिगेशने डिपार्टमंट, बेळगाव यांच्याकडून काही दाखल घेतली गेली नाही. धरण परिसरात असलेली मालमत्ता दगड, खडी, वाळू यांची चोरी केली जाते. परंतु यावर काही कुणी बोलत नाही सदर धरणाची रखवली करायला शिपायाची व्यवस्था सुद्धा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना हंगामामध्ये पाणी व्यवस्था योग्यरितीने होत नाही धरणाकडे जाणाऱ्या रोडवरील पाईप फुटलेले आहेत त्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे.
२००१ साली राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे धरणाची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यासाठी एक लघु पाणी पुरवठासंघाची निर्मिती करण्यात आली पण या संघाला आजपर्यंत काही उपयोग झाला नाही. तसेच राजकारणी, लोकप्रतिनिधी लोक धरणाचा विषय मतदानासाठी मोठ मोठे आमिष दाखवून शेतकऱ्यांची दिशा भुल करतात. सदर धरणाचा वापर फक्त पावसाळ्यामध्ये प्रेमीयुगल लोकांसाठी मज्जेचा विषय राहिलेला आहे याचा बिचाऱ्या गरीब शेतकऱ्याला काही उपयोगच नाही आहे तरी सरकारने त्वरित निधी मंजूर करून या धरणाच्या दुर्दैवी अवस्थेचा आढावा घेऊन लवकरात लवकर येथील धरणाचे नादुरुस्त, रस्ता, कालवे, पोट कालवे व शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी व धरणाची देखरेख करण्यासाठी रखवालदाराची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी ग्राम पंचायत सदस्य गुंडू रामा हलशिकर यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta