Monday , December 8 2025
Breaking News

मणतुर्गा, रुमेवाडी, असोगा येथे खानापूर समितीची जनजागृती

Spread the love

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुका, मराठी आपला बाणा मराठी आपली संस्कृती, मराठी आमचे अस्तित्व मराठी आमची ओळख. ही ओळखच पुसण्याचे काम राष्ट्रीय पक्षांकडून सुरू असताना मेंढरासारखे तुम्ही-आम्ही स्वस्त बसून होणार आहे का? ६० वर्षे समितीचे एकहाती नेतृत्व मान्य करून तालुक्याची धुरा समितीच्या हाती सोपविणारे तुमचे आमचे आई-वडील, आजी-आजोबा आणि आमचे पुर्वज हे खुळे नव्हते. ती शहाणी माणसे होती आपण सर्वजण आपल्या मायमराठीला विसरुन राष्ट्रीय पक्षांच्या गोठ्यातील जनावर होण्यापेक्षा स्वाभिमानाची निशाणी असलेल्या सीमा चळवळीच्या पालखीचे भोई होऊया, असे विचार आज मणतुर्गे येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झालेल्या सभेचे अध्यक्ष माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार यांनी व्यक्त केले. यावेळी सभेचे प्रास्ताविक व स्वागत आबासाहेब दळवी, समिती नेते यांनी केले. याप्रसंगी श्री. यशवंतराव बिर्जे, नारायण कापोलकर, मऱ्याप्पा पाटील, मुरलीधर पाटील यांची भाषणे झाली. येत्या शुक्रवार दिनांक २१/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता खानापूर शहरातील चिरमुरकर गल्ली येथील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये श्री ज्ञानेश्वरी व तुकोबांची गाथा या पवित्र ग्रंथांचे सामुहिक पुजन व किर्तन या कार्यक्रमाने होणार आहे. मराठी जागरांच्या या दोन ग्रंथांसह गावोगावी जाणार आहे. व मराठी अस्मिता टिकविण्यासाठी सीमाप्रश्न सुटेपर्यंत समितीशी एकनिष्ठ राहण्यासाठी वचनबद्ध होऊया असेही आवाहन यशवंत बिर्जे यांनी केले. आज रुमेवाडी, खानापूर शहर, असोगा, मणतुर्गे येथे जाऊन समितीची जागर केली. यावेळी रुमेवाडी येथे बी. एल. चौगुले, अर्बन बँक खानापूरचे निवृत्त मॅनेजर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. तर असोग येथे लक्ष्मण रवळु पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. तर मणतुर्गे येथे सभेला उपस्थित असलेले गणपतराव गावडे, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे, दशरथ देवकरी, हणमंत पाटील, संजय पाटील, संभाजी चोर्लेकर, राजाराम पाटील, राजाराम गुंडपीकर, मारुती पाटील, मारुती दळवी, सुराप्पा पाटील, कृष्णा चोर्लेकर, गजानन गुरव, अरविंद शेलार, प्रदीप पाटील, रामलिंग चोर्लेकर, रामचंद्र पाटील, मनोहर गुंडपीकर, प्रेमानंद पाटील, चांगाप्पा मांगेलकर, बळीराम देसाई, चंद्रकांत पाटील, सदाशिव दळवी, दिपक पाटील, नारायण पाटील, राजाराम पाटील, अल्बेट सोज, मारुती पाटील, महादेव पाटील, भाऊ पाटील, हणमंत दळवी, मोहन देवकरी, कल्लाप्पा देवलतकर, सौ. जयश्री देवलतकर, सौ. आशा चोर्लेकर, सौ. नेहा कानशीनकोप, ज्योतिबा गुरव इत्यादी बहुसंख्य सीमाप्रेमी हजर होते. प्रल्हाद मादार यांनी आभार प्रदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *