खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका जेडीएस पक्षाचा जांबोटी विभाग महिला मेळावा हबनहट्टी येथील स्वयंभू मारूती देवस्थानाच्या परिसरात सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेडीएसचे नेते व मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान होते.
यावेळी व्यासपीठावर जेडीएसचे जिल्हा उपाध्यक्ष लियाकत बिच्चणावर, तालुका ब्लॅक अध्यक्ष एम. एम. सावकार, बाळू पाटील, गोपाळ बाबशेट, इरय्या पुजार, रामा गावाडे, शफिमहमद इनामदार, विजय बिरजे, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक शफिमहमद इनामदार यांनी केले.
यावेळी जीएसएम नेते नासीर बागवान व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी जांबोटी विभागाच्या महिला मेळाव्याला देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी, तळेवाडी, बैलूर, बेटगेरी, मोरम,
कालमनी, चिखले, गोसे, बेटने, पारवाड, कबनाळी, चिगुळे, मान, सडा, चोर्ला, तीर्थकुंडे, गवळी वाडा, कुसमळी आदी गावच्या १५०० महिला महिला मेळाव्याला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना जेडीएसचे नेते नासीर बागवान म्हणाले की, जांबोटी विभागातील महिलांचे जीवनमान सुधारावे. महिलांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केला आहे. या भागातील मंदिर उभारण्यासाठी, सामाजिक कामासाठी मी सर्वोतोपरिने प्रयत्न केले आहे. यापुढे करणार आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपले मोलाचे सहकार्य देऊन निवडून द्या, असे आवाहन केले.
यावेळी लियाकत बिच्चणावर, बाळू पाटील, गोपाळ बाबशेट, शफिमहमद इनामदार आदीची भाषणे झाली.
यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली
आभार लियाकत बिच्चणावर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta