खानापूर : हलशिवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक कृष्णराव बाळासाहेब देसाई आणि त्यांचे बंधू श्री. मारुती देसाई (उद्योजक) कोल्हापूर, नारायण देसाई, प्रमिला पांडुरंग पाटील, सावंतवाडी, अरुंधती आबासाहेब दळवी (निवृत्त शिक्षिका) खानापूर यांनी आपले वडील कै. बाळाप्पा देसाई यांच्या स्मरणार्थ श्रीभुवराह नृसिंह लक्ष्मी नारायण मंदिराच्या रथ बांधणीसाठी 25 हजार रुपयांची रोख रक्कम देणागीस्वरूप देवस्थान कमिटीचे चेअरमन श्रीकांत गुरव यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी देवस्थान कमिटीचे अशोक देसाई, वासुदेव तळवार, शिवाजी कदम, शिवाजी भतकांडे, बसप्पा मादार, विठ्ठल कोलकार, महेश जाधव, माऱ्याप्पा गुरव, आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते. रथ बांधणीसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असून भक्तांनी देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कमिटीचे चेअरमन श्रीकांत गुरव यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta