खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील दारोळी, कबनाळी, मुघवडे आदि गावाना बससेवा नाही आहे.
त्यामुळे या गावच्या नागरिकांना तसेच विद्यार्थी वर्गाला खानापूरला ये-जा करणे खूप त्रासाचे झाले आहे. यासाठी दारोळी खानापूर अशी सकाळ संध्याकाळ बससेवा सुरू करावी. तसेच कबनाळी, मुघवडे खानापूर अशी बससेवा सकाळी ९ वाजता व संध्याकाळी ५ वाजता सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन नलावडे ग्राम पंचायतीच्यावतीने तालुका ग्राम पंचायत संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर बसस्थानकाचे डेपो मॅनेजर यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
यावेळी खानापूर बसस्थानकाचे डेपो मॅनेजर यांनी निवेदनाचा स्विकार करून बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष व निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, निलावडे ग्राम पंचायत अध्यक्षा आरती कांबळे, सदस्या पार्वती मुतगेकर, लक्ष्मी नाईक, ओमाणी नाईक, सहदेव पाटील, महादेव कवळेकर, लक्ष्मण शेंगाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta