खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांची कर्नाटक राज्य धनगर गवळी समाजाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली.
नुकताच कर्नाटक राज्य धनगर गवळी समाजाची बैठक हल्याळ येथील गवळी वाड्यात पार पडली.
यावेळी कर्नाटक धनगर गवळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून देवू पाटील मुंदगोड, उपाध्यक्ष भैरू पाटील खानापूर, जनरल सेक्रेटरी जानू गावडे दांडेली व इतर सदस्याची निवड करण्यात आली.
याचबरोबर खानापूर तालुक्यातील बम्मू पाटील उंब्रपाणी व नवलू आवने राजवट यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.
खानापूर तालुक्यातुन कर्नाटक राज्य धनगर गवळी समाजाच्या उपाध्यक्ष पदी आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांची निवड झाल्याने खानापूर तालुक्यातून तसेच धनगर गवळी समाजातून भैरू पाटील यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी भैरू पाटील म्हणाले की, कर्नाटक राज्य धनगर गवळी समाजाच्या उपाध्यक्ष पदी कार्यरत असताना रराज्यासह खानापूर तालुक्यातील अतिमागासलेल्या व जंगल भागातील धनगर गवळी समाजाच्या समस्या प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहिल असे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta