खानापूर (प्रतिनिधी) : मडवाळ (ता. खानापूर) येथे केएलई होमोपेथिक मेडिकल काॅलेज येळ्ळूर रोड बेळगांव व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर नुकताच पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापोली के.जी. ग्राम पंचायतीचे अध्यक्ष संदिप देसाई उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे माजी आमदार, डीसीसी बँक संचालक व भाजप नेते अरविंद पाटील, मल्लाप्पा मारीहाळ, भाजप नेते बाबासाहेब देसाई, डाॅ. रफिक हलशिकर, हभप कोळेकर महाराज आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत नामदेव पाटील यांनी केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी विविध आजारावर मोफत तपासणी करण्यात आली. सहील देसाई, यश खवरे, साक्षि पाटील, सई पवार, साक्षी काकतकर, कुश हिरेमठ, दर्शन लातुर, लुबना शेख,आदी मोफत तपासणी करण्यास परिश्रम घेतले.
या शिबीरात मडवाळ, रेडेकुंडी, आदी गावच्या नागरिकांनी लाभ घेतला. आभार सौ. ज्योती हेरेझ यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta