खानापूर : रामगुरवाडी, नागुर्डे, नागुर्डेवाडा, विश्रांतवाडी, मोदेकोप, ओत्तोळी, दारोळी, ओलमणी, जांबोटी-वडगांव, जांबोटी, रामापूर बाजारपेठ, कुप्पटगिरी आणि निडगल इत्यादी गावांचा दौरा करून २१ ऑक्टोबर २०२२ रोजी होणाऱ्या ज्ञानेश्वरी व तुकोबांची गाथा ग्रंथपूजन करून सीमा पालखीचे उद्घाटन करण्यासाठी जनतेला आमंत्रित करण्यात आले आहे. रामगुरवाडीहून ज्येष्ठ नागरिक शंकरराव सावंत, विश्रांतवाडीहून राजू कुंभार, नागुर्डेतून अशोक पाटील, तानाजी चापगावकर, आनंद चापगावकर, ज्ञानेश्वर पाटील, नारायण महाजन, कृष्णा महाजन, शंकर महाजन तर नागुर्डे वाड्यावरून परशराम पाखरे, आप्पाजी देसुरकर, कृष्णा धुळ्याचे, रवळू वडगांवकर, बाळू बिर्जे, लक्ष्मण पारवाडकर, मोदेकोपहून नारायण कार्वेकर माजी जि. पं. सदस्य, दिगंबर केसरेकर, कृष्णा यरमाळकर, ओत्तोळीहून संजय रामणीचे, भैरू मुतगेकर, दारोळीहून यशवंत पाटील, तातोबा देसाई, श्रीपती देसाई, चंद्रकांत गुरव, वडगांवहून उत्तम देसाई, शाहू देसाई, मारुती देसाई, बडकु देसाई, जांबोटीहून माजी जि.पं. सदस्य जयराम देसाई, वामन देसाई, विजय गुरव, कुप्पटगिरीहून शंकर पाटील, शरद पाटील, हणमंत पाटील, निडगलहून गणपतराव पाटील, परशराम कदम, इत्यादींनी गावच्या वतीने पालखी सोहळ्याला पाठींबा व्यक्त केला. या सोहळ्याचे जनजागृती आवाहन करण्यासाठी समितीची नेतेमंडळी आबासाहेब दळवी, यशवंतराव बिर्जे, मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, मऱ्याप्पा पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, महादेव घाडी, गणपत गावडे, हे. भ. प. कुसाळे चोपदार सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta