खानापूर (प्रतिनिधी) : एमएलसी हणमंत निराणी यांच्या फंडातून खानापूर शहरातील स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलच्या पटांगणावर पेव्हर्स बसविण्याचा शुभारंभ बुधवारी दि. १९ रोजी करण्यात आला.
यावेळी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलचे चेअरमन जयंत तिनेईकर, सेक्रेटरी ऍड. चेतन मणेरीकर, सुहास कुलकर्णी, अमोल शहापूरकर, भाजप तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, युवा नेते पंडित ओगले, बाळू सावंत, प्रकाश निलजकर, राजू जांबोटकर, नगरसेवक आप्पय्या कोडोळी, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चेअरमन जयंत तिनेईकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. तर बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते पेव्हर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ केला.
यावेळी मान्यवर आपले विचार मांडले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta