खानापूर (प्रतिनिधी) : इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन ऑफ बेळगाव टीमचा खेळाडू व करंबळ (ता. खानापूर) गावचा सुपूत्र नितीन पाटील याने राज्य पातळीवर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये खानापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करत तीन गोल्ड मेडल जिंकून खानापूरच्या नाव लौकिकात भर टाकली आहे.
नुकताच सप्टेंबरमध्ये चित्रदुर्ग, हुईना, व शिमोगा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 85 किलो वजनी गटात त्याने प्रथम क्रमांक मिळविला.
नितीन पाटील हे खानापूर फिटनेस क्लबमध्ये खानापूर तालुक्यामधील मुलांना निरोगी राहण्यासाठी सतत मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्यामधून याआधी बरेच शरीरसौष्ठव स्पर्धक जिल्हापातळी, राज्यपातळी व राष्ट्रपातळी स्पर्धेमध्ये भाग घेऊन यश मिळवलेले आहे…
यापुढेही राज्यपातळी व राष्ट्रपातळीवर आम्ही खानापूरचे स्पर्धक मोठे यश संपादन करू, असे नितीन पाटील यांनी सांगितले.
नितीन पाटील यांच्या यशाबद्दल खानापूर तालुक्यातील जनतेकडून अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta