खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना भागधारकांच्या व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील, रयत संघटना तालुका अध्यक्ष महांतेश राऊत व उपाध्यक्ष अखीलसाब मुनवळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील शिवस्मारकात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे ५६,६९९ शेअर मालक आहेत, याना ३५ वर्षापासून कुठल्याही प्रकारचा लाभांश अथवा साखर मिळाली नाही. मयत व्यक्तीचे शेअर वारसदारांच्या नावावर केले नाही. शेतकऱ्यांच्या ऊसाला हमीभाव मिळाला नाही. लिजबद्दल माहिती नाही. सभासदांची सहमती नाही. आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta