Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर येथील नुतन बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी कॉसवरील नव्याने बांधण्यात येणार्‍या बसस्थानकाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या विटा वापरण्यात येत असल्याने तालुक्याचे भूषण ठरणारे बसस्थानक कुचकामी ठरणार असल्याचे मत खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर बोलताना व्यक्त केले.
नुकताच खानापूर शहरातील जांबोटी कॉसवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या बसस्थानकाच्या कामाची पाहणी केली.
यावेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, सदस्य उदय भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. बसस्थानकाच्या बांधकामात वापरण्यात येणार्‍या विटा हातात धरून पाहाता त्या फुटक्या होत्या. त्यामुळे या विटा वापरू नका. अन्यथा बांधकाम कोसळण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. एवढेच नव्हे तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल अशी समज दिली.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *