खानापूर : गोवा राज्यातून आणण्यात येत असलेली गोवा बनावटीची 909 लीटर अवैध दारू जप्त करण्यात अबकारी विभागाला यश आले असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील कणकुंबीनजीक अधिकृत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री धाड घालून ही कारवाई केली. या कारवाईत टाटा टर्बो एक्स-1109 मालवाहू वाहनातून अवैधरित्या वाहतुक केलेल्या विविध कंपन्यांची 909 लीटर गोवा बनावटीची दारू यासह एकूण 9 लाख 33 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अबकारी विभागाचे खानापूर झोनचे उत्पादन शुल्क निरीक्षक दावलसाब शिंदोगी, सदाशिव कोर्टी, उपनिरीक्षक जयराम हेगडे, पुष्पा गडदे, कर्मचारी मंजुनाथ बालगप्पनवर, इरण्णा घाडी, प्रकाश डोणी, अरुणकुमार बंदिगी, रायप्पा मन्निकेरी आदींचा या कारवाईत सहभाग होता.
उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta