खानापूर (प्रतिनिधी) : वड्डेबैल (ता. खानापूर) गावचा सुपूत्र व चापगांव ग्राम पंचायत सदस्य सूर्याजी पाटील हे शेतात गवत कापण्यासाठी गेले होते. शेतात शिकारीसाठी ठेवलेला सुतळीबॉम्ब गवत कापताना विळ्याचा स्पर्श होऊन स्फोट झाला. त्यात त्यांच्या हाताची बोटे फुटून गेली. शिवाय ते गंभीर जखमी झाले. लागलीच त्याना बेळगांव येथील विजय हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. व त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी संपर्क साधून चौकशी केली.
लैला शुगर्स कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, चापगांव ग्राम पंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले व पत्रकार पिराजी कुराडे, प्रभाकर पाटील, गोपाळ भेकणे आदींनी विजया हाॅस्पिटलकडे धाव घेऊन प्रकृतीची विचारपुस केली.
शेतीवाडीत जंगली जनावरांच्या शिकारीसाठी खानापूर तालुक्यात सुतळीबॉम्ब ठेवण्याचे प्रकार वाढत आहेत. याकडे खानापूर वन खात्याचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेतून भितीचे वातावरण पसरले आहे.