खानापूर (प्रतिनिधी) : चापगांवात (ता. खानापूर) येथील गावकऱ्यांच्या संकल्पनेतून नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गणेश समुदाय भवनाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी दि. २७ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकट क. पाटील (मा. पैलवान) चापगांव हे होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली.
यावेळी समुदाय भवनाचे उद्घाटन चापगांव ग्रा. पं. उपाध्यक्ष मारुती पु. चोपडे, बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर हणमंत ब. मादार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विविध देवदेवतांचे फोटो पूजन मान्यवर नेतेमंडळीच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, मल्लाप्पा मारिहाळ, भाजपा युवा नेते पंडित प्र. ओगले, साईकृष्ण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, माजी जि पं सदस्य – खानापूर प्राथमिक कृषी पत्तिन संस्थेचे अध्यक्ष नारायण ल कार्वेकर, सयाजी पाटील, जयवंत खानापूरकर यांच्यासह चापगांव ग्रा. पं. सदस्य, प्राथमिक कृषी पत्तिन सहकारी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, पंचमडळी, महिला भगिनी, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta