रयत संघटनेचे अधिकारी वर्गाला निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिमागासलेला तालुका असुन तालुक्यातील रस्त्याकडे पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष होत आहे. सध्या तालुक्यातील ऊस तोडणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.
त्यामुळे तालुक्यातील ऊसाची वाहतूक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
यासाठी खानापूर तालुका संघटनेच्यावतीने बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कचेरी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हा पीडब्ल्यूडी खात्याचे कार्यनिर्वाह अभियंते सुब्बराव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर तालुका रयत संघाचे प्रकाश तिरपी, चांगाप्पा निलजकर, मनोहर कदम, सदानंद होसुरकर, महेश बाचोळकर, हणमंत खांबले, परशराम गुरव, संतोष कदम, तुकाराम गुरव आदी खानापूर तालुक्यातील शेतकरीवर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta