खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा रेल्वे गेटजवळील कमान उभारण्यात आली आहे.
सध्या रेल्वे लाईनचे दुपदरीकरण करण्यात आल्याने मणतुर्गा रेल्वे गेटवर रुंदीकरणाचे काम चालू आहे. रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. येथील कमानीचा या भागातील उसाच्या ट्रकना ये-जा करताना त्रास होत. कमानीतून उसाच्या ट्रक जात नाहीत त्यामुळे कमान काढुन या भागातील उस वाहतुकीच्यावेळी होणारी अडचण दूर करावी, अशा मागणीचे निवेदन मणतुर्गा, असोगा भागातील शेतकरी वर्गाने तहसीलदार प्रवीन जैन निवेदन देऊन मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा रेल्वेगटजवळील कमान येथून वाहतुक करणार्या उस ट्रकाना अडचणीची ठरली आहे तेव्हा ती कमान काढावी. तसेच मणतुर्गा शेडेगाळी रस्त्याची डागडुजी करावी. मागणीचे निवेदन देताना माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, शांताराम पाटील, भाजप ग्रामीण सेक्रेटरी गजानन पाटील, श्रीकांत पाटील, रामाच्या मस्ती, काडाप्पा उपाशी, गिराळे होणार, श्री. धवलसाब आदी शेतकरी उपस्थित होते.