खानापूर : खानापूर तालुक्यातील कमसीनकोप्प गावातील सात वर्षीय वरुण बसाप्पा कोलकार याचा विद्युत्त तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती समजताच भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी व बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या घरी भेट देऊन मुलाच्या आई व कुटुंबीयांना धीर दिला.
मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगून त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. यावेळी मनोहर मादार, परशुराम तलवार, परशुराम कोळकर, बालेशा चव्हाणवर, दिपक चौगुले, वौष्णवी भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, खानापूर भाजपा महिला मोर्चाच्या प्रभारी तथा बेळगाव ग्रामीण भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार करून त्यांच्याशी भाजप संघटनेबाबत चर्चा केली.
अर्जुन पाटील. ग्रामस्थ उपस्थित होते. नंतर त्यांनी दोड्डहोसूर गावातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन संघटनेबाबत चर्चा केली व त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा केली.
Belgaum Varta Belgaum Varta