
खानापूर : एक नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण व निषेध सभा आयोजित करण्यात आली. शिवस्मारक येथे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लाक्षणिक उपोषणाला तालुक्यातील समितीप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड, पुंडलिक मामा चव्हाण, शंकर पाटील यांचा सहभाग आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा ठरला आहे. निषेध सभेमध्ये मराठी भाषिकांनी जुलमी कर्नाटक सरकारचा व केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण हा लढा असाच चालू ठेवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. यावेळी समितीचे ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड, शंकर पाटील, पुंडलिक मामा चव्हाण, यशवंत बिर्जे, आबासाहेब दळवी, नारायण कापोलकर, मुरलीधर पाटील मारुतीराव परमेकर, विलास बेळगावकर, अनिल पाटील, निरंजन सरदेसाई, रणजित पाटील, अविनाश पाटील, विशाल पाटील, बाळासाहेब शेलार, प्रकाश चव्हाण, मरू पाटील, सुनील पाटील, संतोष पाटील, हणमंत मेलगे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta