खानापूर (प्रतिनिधी) : रोटरी ई. क्लबतर्फे खानापूर येथील शांतीनिकेतन इंग्रजी माध्यम शाळेमध्ये मासिक पाळी, स्वच्छता व व्यवस्थापन या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ३५० हून अधिक विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. रोटेरियन डॉ. अनिता उमदी यांनी विद्यार्थीनींना व्हिडीओ दाखवून सविस्तर माहिती सांगितली.
शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाळवे (फाटक) व शिक्षिका श्रीमती उज्वला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास रोटरी ई-क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रमोद हणमगोंड, सचिव सागर वाघमारे व कविता कणगणी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थीनींनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व मुख्याध्यापिकांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta