खानापूर : मौजे चापगाव (ता. खानापूर) येथे रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी ठीक 03:00 वा. महिला व पुरुष विभागात भव्य कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी कुस्तीपट्टुंनी याचा अवश्य लाभ घ्यावा. कुस्ती तालीम आधुनिक युगात बंद पडण्याच्या मार्गावर असून त्याची पुनश्च आवड निर्माण व्हावी, सदृढ युवक तयार व्हावा, यासाठी समस्त जनतेला पुनश्च जागरूक करण्यासाठी, नवोदित पैलवानांना मार्गदर्शन देण्यासाठी, विश्वभारती कला आणि क्रीडा संघ बेळगाव यांच्यामार्फत कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 22 किलो ते 70 किलो वजन गटातील व ओपन जोड बघून कुस्ती लावली जाईल. पैलवानांना विशेष प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येईल. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
माजी पैलवान श्रीमान जीवापा पवार राजहंसगड यांचे वय 104 चा पल्ला पार केलेला सीनियर सिटीजन पैलवान म्हणून यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात येणार आहे व मैदानी खेळाला प्रारंभ करणार आहोत यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले आहे.
माजी पैलवान श्रीमान नारायण उमाना कदम राहणार निडगल यांना 90 वर्ष हेही मैदानामध्ये उपस्थितीत राहणार आहेत,
असे खानापूर तालुका विश्वभारती कला क्रीडा संघाचे कार्याध्यक्ष विनोद शिवाजी गुरव (हेबाळ) यांनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta