खानापूर (प्रतिनिधी) : श्री चौराशीदेवी संगीत कलामंचच्यावतीने खानापूर तालुका आयोजित खुला गट श्रीविठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धा रविवार दि. ६ रोजी सकाळी ९ वाजता खानापूरातील केदार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप, प्रगतशील शेतकरी पुन्नाप्पा बिर्जे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दीपप्रज्वलन माजी आमदार दिगंबर पाटील, श्री महालक्ष्मी ग्रुप संस्थापक विठ्ठल हलगेकर, उद्योजक दयानंद नेतलकर, नगरसेवक नारायण मयेकर, शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, माजी ता. प. सदस्य बाळासाहेब शेलार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी आदीच्याहस्ते होणार आहे.
यावेळी विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन राष्ट्रपती पुरस्कार आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी, उद्योजक हभप शंकर पाटील, अमृत शेलार, विलास बेळगावकर, निरंजन सरदेसाई, धनश्री सरदेसाई, गोपाळ पाटील, विशाल पाटील, मुरलीधर पाटील, पांडुरंग सावंत, आदीच्याहस्ते होणार आहे.
यावेळी सत्कारमुर्ती विष्णू साडेकर, संगीत विशारद एम. व्ही. चोर्लेकर, वेदमूर्ती पाटील याचा सत्कार होणार आहे.
कार्यक्रमाला तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील, बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, नामदेव बेटगिरकर, ऍड. एच. एन. देसाई, एस. जी. शिंदे, आदी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विजयी भजन स्पर्धकांना पहिले बक्षिस ११ हजार रूपये, दुसरे बक्षिस ९ हजार रुपये, तिसरे बक्षिस ८ हजार रूपये, अशी अकरा बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी संगात भजन स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री चौराशीदेवी संगीत कलामंचच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta