सोमवारी महत्वपूर्ण बैठक
खानापूर : खानापूर तालुक्यात म. ए. समिती दोन गटात विखुरलेली आहे. दोन्ही गट एकत्र येण्यासाठी दोन्ही गटांशी चर्चा करुन एकिची प्रक्रिया पुढे नेण्यासंदर्भात सोमवार दि. ७ रोजी सकाळी ११ वा. शिवस्मारकातील सभागृहात मध्यवर्ती म. ए. समिती प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्यात आली आहे.
गर्लगुंजी येथील माउली ग्रुप आणि तालुक्यातील ६१ निष्ठावंत कार्यकर्त्यानी शनिवारी (दि.५) एकी संदर्भात मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर आदिंची भेट घेतली. अध्यक्ष दळवी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. तालुक्याती सीमा चळवळीची स्थिती, मराठी भाषा संस्कृतीवर होणारे आक्रमण, राजकीय स्थिती तसेच संघटनेची होणारी पिछेहाट यावर प्रामुख्याने चर्चा झाली. त्यानंतर निवेदन देण्यात आले.
सोमवारी होणाऱ्या बैठकीत तालुक्यातल्या दोन्ही गटांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. त्याकरिता दोन्ही गटातील समिती नेते आणि कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन माउली ग्रुप आणि समितीनिष्ट कार्यकर्त्यांनी आहे.
Belgaum Varta Belgaum Varta